मुंबई (वार्ताहर) : ऑल महाराष्ट्र राज्य सिनियर किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२२, किक बॉक्सिंग स्पोर्टस असोसिएशन महाराष्ट्र यांनी अहमदनगर येथे आयोजिक केलेली राज्य स्पर्धा नुकतीच पार पडली. शितो रीयू स्पोर्टस कराटे अँड किक बॉक्सिंग असोसिएशन व स्पोर्ट किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर या संस्थेच्या प्राप्ती रेडकर व विघ्नेश मुरकर यांनी क्रिएटीव्ह फॉर्म, अथर्व घाटकर याने लाईट कॉन्टॅक्ट, साहिल बापेकर याने लो किकमध्ये ४ सुवर्ण पदकांची कमाई करत राज्य स्पर्धेत मुंबई शहराचा डंका कायम ठेवला.
रसिका मोरे हिने पॉईंट फाईट, भूपेश वैती याने लाईट कॉन्टॅक्टमध्ये एकूण २ रौप्य पदके जिंकले. राहुल साळुंखे व विघ्नेश मुरकर यांनी लाईट कॉन्टॅक्ट, महेंद्र राज नाडार याने पॉईंट फाईटमध्ये एकूण ३ कांस्यपदके पटकावली. प्रशिक्षक उमेश मूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत.
गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट यांनी या खेळाडूंच्या स्पर्धा पूर्वतयारीसाठी मोलाची मदत केली आहे. सुवर्णपदक विजेते विघ्नेश, प्राप्ती, अथर्व व साहिल हे मुंबईकर खेळाडू ऑगस्ट महिन्यात तामिळनाडू येथे होणाऱ्या सिनियर राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करतील.