Thursday, July 3, 2025

गडचिरोलीतील रेस्क्यू ऑपरेशनमुळे २ युवक सुखरुप बाहेर

गडचिरोलीतील रेस्क्यू ऑपरेशनमुळे २ युवक सुखरुप बाहेर

गडचिरोली (हिं.स.) : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (पोलीस दल) गडचिरोली व राज्य आपत्ती प्रतिसादर नागपूर टिम क्रमांक १ यांनी माडेमूल येथील मृतदेह पोहचवून परत येत असतांना रानमूल व माडेमूल मधील नाल्यावर ॲम्बूलन्स चालक व सहायक (यशवंत गुणाजी कांबळे रा.कोटगल व वैभव मोरेश्वर नंदेश्वर रा. नवेनाव) यांच्या सभोवताल पाणी झाल्याने त्यांना त्यातुन निघता येत नव्हते.


सदर बाब रेस्क्यू टिम यांच्या लक्षात येताच तहसिलदार महेंद्र गणवीर, एसडीआरएफ चे पो.नि.एम.एम. लांबेवार व पोलीस निरिक्षक देशपांडे, सा.मो.प.वि.गडचिरोली यांचे कडुन रेस्क्यू ऑपरेशन करुन सदर दोन युवकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. रेस्क्यू वर टेकाम, परेदशी, महांदे, चव्हान, शेणकपाट, कोल्हे, टेकाडे, पहाडे, चाकले, कनिरे, झलेके, बेलेकर जूनघरे, चामरे व टीमने सहकार्य केले.

Comments
Add Comment