|
वाद-विवाद टाळा
मेष – सरकारी नोकरी करणाऱ्यांनी खूप सावध राहिले पाहिजे. त्यांच्या कार्यक्षेत्रात काही जर चूक झाली, तर त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो किंवा काही जातक वरिष्ठ पदावर आहेत, सामाजिक क्षेत्रात काम करतात, त्यांनी कुठल्याही सामाजिक संमेलनात भाग घेताना, आपली प्रतिमा मलिन होऊ नये याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या कालावधीमध्ये शत्रू तोंड वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या पदावर डाग लावण्याचा प्रयत्न ते करतील. तसेच ज्येष्ठ किंवा वडील यांच्याशी मतभेद होऊ शकतात, पण तुम्ही शांत राहा. त्यांच्या विचाराशी सहमत व्हा.
|
|
नवनवीन संधींचा लाभ
वृषभ – इच्छुकांचे विवाह ठरतील. प्रकृती स्वास्थ्य चांगले असेल. या कालावधीमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट यांचा व्यवसाय चांगला चालेल. त्यांना आर्थिक फायदा होईल. त्याचप्रमाणे संगीत, कला क्षेत्रातील लोकांना चांगल्या संधी येतील. खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जावे लागेल. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात राहील. त्याचप्रमाणे मित्रांबरोबर मनोरंजनासाठीही बाहेर जातील. राजनीती क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा कालावधी चांगला आहे. जर स्थावर मालमत्ता खरेदी करायची असेल तरी हा कालावधी चांगला आहे. नवीन संधी येतील, संधीचा फायदा घ्या. |
|
सहलीचा कार्यक्रम आखाल
मिथुन – आपल्या बहीण-भावाबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आपल्या बोलण्याने आपले सहकारी दुखावले जाणार नाहीत, याची काळजी घ्या. शुभग्रहाच्या गोचर भ्रमणामुळे आपल्या राहणीमानात उच्च बदल होणार आहेत. त्यासाठी जास्त खर्च होणार आहे. गुंतवणूक करताना खूप विचारपूर्वक केली पाहिजे. शेअर मार्केट किंवा स्टॉकमध्ये नवीन गुंतवणूक करू नये. मित्र किंवा कुटुंबासमवेत बाहेर जाण्याचा सहलीचा कार्यक्रम आखाल. मुलं आनंदात असतील. विद्यार्थ्यांना या कालावधीत यश मिळेल. |
|
आर्थिक व्यवहार जपून करा
कर्क – काही जातकांना सावध राहणे आवश्यक आहे. कारण जे जातक स्टॉक मार्केटमध्ये काम करत आहे, त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त गुंतवणूक करू नये. घाईगर्दीत कुठलाही व्यवहार करू नका. महिला वर्गांनी खरेदीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा, आर्थिक नियोजन गडगडण्याची शक्यता आहे. त्यावरून घरातील व्यक्तींशी वादविवाद होऊ शकतो. विवाहयोग्य मुलांसाठी चांगल्या घराण्यातून स्थळे येतील. सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या. आपले आर्थिक व्यवहार जपूर करणे आवश्यक आहे.
|
|
कार्यमग्न राहाल
सिंह – सकारात्मक विचारांना प्राधान्य द्याल व आपले लक्ष पुरे करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. आपली तर स्वप्ने मोठी आहेतच, पण त्या प्रमाणात आपली मेहनत कमी पडत होती. आता आपण जास्त मेहनत कराल व ध्येयप्राप्ती करून घ्याल. खासगी नोकरी करणाऱ्यांना सावध राहण्याचा इशारा आहे. सहकार्य वर्गाशी काही वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य व वैवाहिक सौख्य चांगल्या प्रकारे मिळणार आहे.
|
|
प्रगती-उन्नती होईल
कन्या – शुभग्रहांचे भ्रमण आपणास लाभकारी ठरणार आहे. एखाद्या व्यवसायामध्ये आपणास चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ होणार आहे. प्रगतिपथावर राहणार आहात. नोकरीमध्ये पदोन्नती अथवा वेतन वृद्धीसारख्या घटना घडू शकतात. काहींना परदेशगमनाचे योग आहेत. एखादी विशेष महत्त्वाची कामगिरी सोपवली जाऊ शकते. वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येईल. संततीविषयी जे काही प्रश्न आणि चिंता होती, त्यामध्ये मार्ग निघणार आहेत. आळसाचा त्याग करून आपण आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करणे अतिशय चांगले होईल.
|
|
प्रवासाचे योग
तूळ – आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपणास खूप काम वाढणार आहे. नवीन जबाबदारी पण आपणास देण्यात येणार आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढणार आहे. वेळेमध्ये आपले टार्गेट पूर्ण होते की नाही, अशी आपणास शंका येणार आहे. पण आपण आपले काम वेळेत पूर्ण कराल. त्यामुळे आपले वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संबंध चांगले राहतील. ते आपणावर खूश होणार आहेत. त्यातून आपल्याला परदेशात सहलीचे बक्षीस मिळू शकते. आपणास या प्रवासामध्ये आनंद मिळणार आहे.
|
|
आर्थिक लाभ
वृश्चिक – आपल्याला आर्थिक लाभ चांगल्या प्रमाणातच होणार आहेत. बरेच दिवस आपले कर्ज फिटत नव्हते, ते कर्ज या कालावधीमध्ये फिटून जाणार आहे. त्यामुळे आपल्याला मानसिक समाधान व शांतता मिळणार आहे. व्यापार-व्यवसायामध्ये आपल्याला आपल्या बहीण-भावांचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे. ते आपल्या व्यापार, व्यवसायात गुंतवणूकही करू शकतात किंवा आर्थिक मदत आपणास मिळणार आहे. त्यामुळे व्यापार-व्यवसायात प्रगती कराल. आपणास लहान-मोठ्या अडचणीही येऊ शकतात तसेच मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागेल.
|
|
मानसिक संतुलन नीट ठेवा
धनु – आपल्या वैवाहिक जीवनामध्ये ऊन-सावलीची परिस्थिती निर्माण होणार आहे. आपली जवळची व्यक्ती आपल्या बदनामीला कारण होऊ शकते. याच कारणाने आपले वैवाहिक जीवन अस्थिर होऊ शकते. लहान मोठ्या होणाऱ्या कौटुंबिक वादविवादांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल तसेच आपली मते इतरांवर लादू नका. कोणताही लहान-मोठा निर्णय शांतपणे व पूर्ण विचारांनी घेण्याची आवश्यकता. व्यक्तिगत आयुष्यामध्ये काही आव्हाने समोर येण्याची शक्यता आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रांमध्ये व्यस्त राहाल.
|
|
कार्यक्षेत्रात प्रगती
मकर – आपल्याला बेकायदेशीर मार्गातून धनप्राप्ती करण्याची इच्छा होऊ शकते किंवा काही गुप्तरितीने अर्थप्राप्ती करण्याचा योग आहेत. पण आपण लक्षात ठेवा, अशा रीतीने पैसे कमावल्यास काही हातात येणार नाही. आपल्या कर्तृत्वावरच आपण आपले धन कमवावे. नोकरीमध्ये आपल्या अधिकार कक्षेमध्ये आपले कार्य पूर्ण करा. प्रेमी-प्रेमिकांना काही आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. पण कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येईल. प्रेमप्रकरणात जोडीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नका. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे चांगले.
|
|
स्पर्धात्मक यश
कुंभ – आपण ज्या गोष्टीत हात घालाल, त्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे. जर आपल्याला कारखान्याचे पुनर्निर्माण करायचे काम राहून गेलेले असेल, तर ते या काळामध्ये पूर्ण कराल; परंतु आपले काम आपणच करा. आजचे काम उद्यावर ढकलू नका. आळस नको. सतत कार्यमग्न राहून प्रयत्नशील राहणे गरजेचे ठरेल. नवीन वाहन खरेदी करण्याचे योग आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या मनाजोगत्या संस्थेमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा होती, त्या संस्थेत किंवा इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना अॅडमिशन मिळू शकते. मनातील ही इच्छा पूर्ण होईल. |
|
कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल
मीन – आपली आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. आर्थिक लाभही मोठ्या प्रमाणात होतील. न मिळणारे पैसेदेखील आपणास मिळतील. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. नव्याने उधारी टाळा. नोकरीमध्ये विशेष संधी उपलब्ध होतील. काहींना परदेशगमनाचे योग. जे जातक नोकरीच्या शोधात आहेत, अशा जातकांचा नोकरीविषयक शोध संपुष्टात येईल. नोकरी मिळेल. आपण आपल्या जोडीदाराच्या नावे गुंतवणूक करण्याची इच्छा असल्यास ती जर स्थिर मालमत्ता केली, तर ती फायदेशीर ठरेल. आपल्याला आपल्या जवळच्या मित्राकडून आर्थिक लाभ होऊ शकतात.
|