
नवी दिल्ली (हिं.स) : विक्रमी लसीकरणावर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोविड १९ प्रतिबंधक लस मात्रांचा २०० कोटीचा टप्पा पार केल्याबद्दल देशवासीयांचे कौतुक केले.
ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " भारताने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. कोविड प्रतिबंधक लस मात्रांचा २०० कोटींचा विशेष टप्पा पार केल्याबद्दल सर्व भारतीयांचं अभिनंदन.
भारताची लसीकरण मोहीम इतक्या वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांबद्दल मला अभिमान वाटतो. या लसीकरण मोहिमेमुळे कोविड -19 विरोधातला जागतिक लढा आणखी मजबूत व्हायला मदत होईल.
संपूर्ण लसीकरण प्रक्रियेत देशवासीयांनी विज्ञानावर आपला विश्वास दाखवला. आपले डॉक्टर, परिचारिका, पहिल्या फळीतले कर्मचारी, वैज्ञानिक, संशोधक आणि उद्योजक यांनी सुरक्षित भूमी ठेवण्यात मोठे योगदान दिले.मी त्यांच्या धैर्याचं आणि अथक परिश्रमाचे कौतुक करतो.