
नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत भारताच्या लसीकरण अभियानाने नवीन विक्रम आणि महत्वाचा टप्पा संपादित केला. भारताने २०० कोटी मात्रांचा टप्पा पार करुन एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे.
या संदर्भात ट्वीटर द्वारे मनसुख मांडवीया म्हणाले, "मोठे ध्येय, मोठे विजय! सर्व अडचणींवर मात करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०० कोटी लसीकरणाचा नवा टप्पा गाठला आहे. कायम स्मरणात राहणारा क्षण! जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सातत्याने नवीन विक्रम करत आहे.
https://twitter.com/mansukhmandviya/status/1548596778831908864?cxt=HHwWgMC46Zik3P0qAAAAतब्बल २०० कोटी लसीकरणाचा गौरवशाली प्रवास जन-भागीदारीच्या भावनेने समर्थित, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली भारताचा लसीकरण प्रवास सबका प्रयासचे पराक्रमी प्रतीक म्हणून उदयास आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचला आहे. २०० कोटी लसीकरण ही असामान्य कामगिरी इतिहासात कोरली जाईल!"