नवी दिल्ली / मुंबई (हिं.स.) : सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजीअमने अतिरिक्त न्यायमूर्तींच्या नावाची शिफारसीनुसार मुंबई उच्च न्यायालयात नऊ अतिरिक्त न्यायमूर्तींची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या ५४ वरून ६३ झाली आहे.
केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजीजू यांनी शनिवारी याबाबतची अधिसूचना जारी करत अतिरिक्त न्यायमूर्तींच्या निवडीला मंजुरी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजीअमने अतिरिक्त न्यायमूर्ती पदासाठी ॲड. किशोर संत, ॲड. वाल्मीकी मेन्झेस, ॲड. कमल खटा, ॲड. शर्मिला देशमुख, ॲड. अरुण पेडणेकर, ॲड. संदीप मारने, ॲड. गौरी गोडसे, ॲड. राजेश पाटील आणि ॲड. आरीफ डॉक्टर यांच्या नावाची शिफारस केली होती.
त्या नावांना केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी मंजुरी दिली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची ९४ पदे असून सध्या ४५ कायमस्वरूपी व नऊ अतिरिक्त न्यायमूर्ती कार्यरत आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…