Monday, July 22, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘मन उडू उडू झालं’ घेणार निरोप

‘मन उडू उडू झालं’ घेणार निरोप

दीपक परब

‘मन उडू उडू झालं’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत सध्या नव-नवीन ट्विस्ट येत असून सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. तसेच या मालिकेतून काही पात्रांची ‘एक्झिट’ही झाली असून लवकरच ही मालिकाही प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे ‘इंद्रा-दीपू’चे चाहते नाराज झाले आहेत. ‘मन उडू उडू झालं’चा शेवटचा भाग १३ ऑगस्टला टेलिकास्ट होणार आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका पहिल्या दहा क्रमांकात आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असूनदेखील ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.

‘मन उडू उडू झालं’ मालिकेच्या आगामी भागात देशपांडे सरांनी इंद्रा-दीपूच्या प्रेमाचा स्वीकार केलेला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता मालिकेत लगीनघाईला सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता ‘इंद्रा-दीपू’चा लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे.

मराठमोळ्या अनुषाची तुफान चर्चा

टीव्ही अभिनेत्री, मॉडेल अनुषा दांडेकर नेहमीच तिच्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत असते. नुकतेच तिने एक फोटोशूट केले असून या फोटोंचीही सोशल मीडियावर गरमागरम चर्चा सुरू आहे. या फोटोमध्ये ती काउचवर बसून पोज देताना दिसत आहे. अनुषाने बेबी पिंक कलरचा थाय-हाय स्लिट स्कर्ट स्टाइल केला आहे.

अनुषाने ‘एमटीव्ही’ मधून अँकर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल, लव्ह स्कूल, सुपरमॉडेल ऑफ द ईयर असे रिअॅलिटी शोज ‘जज’ केले आहेत. अनुषा तिच्या खासगी आयुष्याबाबतही चर्चेत होती. करण कुंद्रासोबत अनुषा काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. अनुषाच्या या फोटोंना चाहत्यांकडूनही अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

‘बार्बी डॉल’…दिशा पटानी

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या सौंदर्याने अनेक चाहते घायाळ होत आहेत. दिशा आपले अनेक फोटो आणि व्हीडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल करत असते. दिशा पटानी तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत असते. सध्या दिशा आपला आगामी चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न’च्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त आहे. नुकताच दिशाने तिच्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिशा आगदी ‘बार्बी डॉल’सारखी दिसत आहे. ‘एक व्हिलन रिटर्न’च्या प्रमोशनसाठी तिने खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटसाठी तिने काळ्या रंगाची बिकनी परिधान केली आहे. यामध्ये दिशा खूपच सुंदर दिसत आहे. या बिकनीला नाजूक अशा स्ट्रिप्स देण्यात आल्या होत्या. तर या बिकनीला ट्यूबचा आकार देण्यात आला आहे. या ट्यूब टॉपवर दिशाने स्कर्ट परिधान केला आहे. त्यामध्ये दिशाचा लूक अतिशय सुंदर वाटत आहे. ‘बार्बी डॉल’चा तिचा हा अवतार पाहून सोशल मीडियावर खमंग चर्चा सुरू झाली आहे. दिशाने या लूकसाठी हलका मेकअप आणि वेव्ही हेअरस्टाइल केली होती. या फोटेशूटसाठी तिने हातात एक कडे घातले आहे व बोटांत अंगठ्या परिधान केल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -