सिंगापूर : भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधूने सिंगापूर ओपनचे विजेतेपद पटकावले. सिंगापूर ओपन स्पर्धेतील अंतिम सामन्यात पी. व्ही सिंधूने चीनच्या वांग झि यि हीचा २१-९, ११-२१, २१-१५ असा पराभव केला आहे. या कामगिरीसह पी.व्ही सिंधू सुपर ५०० विजेतेपदाची विजेती ठरली आहे. सातव्या मानांकित पीव्ही सिंधूने ११व्या मानांकित वांग झी यीचा ५८ मिनिटांच्या लढतीनंतर पराभव केला.
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूचे यंदाचे हे तिसरे विजेतेपद आहे.पहिल्यांदाच सिंधूने सिंगापूर ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेनंतर सिंधू बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.