मुंबई : शिवसेनेतल्या बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी सत्र सुरूच आहे. शिवसेना नेते विजय शिवतारे यांचीही आता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच त्यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करतात. विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.