
नरेश कोळंबे
कर्जत (वार्ताहर) : महाराष्ट्र शासनाकडून जिल्ह्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जातात. सदरचे गणवेष शिवून घेण्यासाठी सर्वशिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा स्तरावरून शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर अनुदान दिले जात असते.
मात्र रायगड जिल्ह्यात या प्रक्रियेत अनागोंदी झाले बाबतची प्रकरणे समोर आल्यानंतर सम्यक विद्यार्थी आंदोलनचे वतीने प्रश्न मिडियामार्फत लावुन धरला होता. आणि त्याची चौकशी सुदधा सुरू होती. त्याची दखल घेत विधानसभेत प्रश्न उपस्थित करणेत आला आहे आणि त्यानुसार जिल्हा शिक्षणाधिकारी यांना अहवाल सादर करणेचा आदेश देखील देण्यात आला आहे.
रायगड जिल्हा परिषद मधील अनेक शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक ह्यांना विचारात न घेता गेल्यावर्षी परस्पर गणवेशाचे वाटप करण्यात आले होते. आलेले गणवेष नक्की कोणाकडून आले आहेत ह्याचे उत्तर कुठल्याही मुख्याध्यापक , शिक्षक किंवा केंद्रप्रमुख ह्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे ह्या गणवेष वाटपात घोटाळा झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे ह्या गोष्टीला उजेडात आणण्यात आले.
या गणवेष वाटपात झालेल्या घोटाळ्यातील सर्व दोषी ना शिक्षा व्हावी.या चौकशी दरम्यान पुन्हा सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे आवाहन करण्यात येते की, अहवाल सादर करणेसाठी कुठल्याही अधिकारी व मुख्याध्यापक, शिक्षक वर्गाने कुठलेही खोटे जबाब व कागदपत्रे तयार करू नये अन्यथा सर्वांच्या वर कारवाई होईल. -अँड. कैलास मोरे (सम्यक विद्यार्थी आंदोलन)