Monday, July 8, 2024
Homeमहत्वाची बातमीशिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार!

शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार!

मुंबई : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. पहिल्या टप्प्यात १० मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाचे पाच आणि भाजपचे पाच मंत्री शपथ घेणार असल्याचे समजते. हा शपथविधी येत्या १९ जुलै रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आधी १० मंत्र्यांना शपथ देणार असून अधिवेशन संपले की दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता पहिल्या टप्प्यात कोणाला संधी मिळणार, हे पहावे लागणार आहे.

२५ जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याआधी १८ जुलै रोजी राष्ट्रपतिपदाची निवडणूक आहे. राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाला वेग येणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक आमदारांचे प्रयत्न सुरू असून, शिंदे आणि फडणवीस यांच्यात राज्यात तसेच दिल्लीतही बैठका पार पडल्या आहेत. दिल्लीत अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यानही मंत्रीमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याचे कळते. या बैठकीत मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, आता शपथविधी पार पडणार असल्याचे समजते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -