मेक्सिकोत नौदलाचे हेलिकॉप्टर कोसळून १४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (हिं.स.) : मेक्सिकोतील उत्तरेकडील राज्य सिनालोआ येथे नौदलाचे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला तर एका जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये १५ जण असल्याची माहिती मिळाली आहे.


हा अपघात कशामुळे झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र यामागे घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिनालोतील ड्रग्ज माफिया राफेल कारो क्विंटेरो याच्या अटकेमुळे हा अपघात झाला असल्याचे म्हटले जात आहे.


दरम्यान शुक्रवारी ड्रग माफिया राफेल कारो क्विंटेरो याला अटक केली होती. त्याच्यावर अँटी-नार्कोटिक्स अधिकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप होता. याचप्रकरणी त्याला सिनालोआ राज्यातील चोईक्स नगरपालिकेच्या हद्दीत पकडले.

Comments
Add Comment

Afghan Foreign Minister Muttaqi India Visit : अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात! संबंध दृढ करण्यावर दोन्ही देशांचा भर

नवी दिल्ली/काबूल : अफगाणिस्तानचे (Afghanistan) परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी भारत दौऱ्यावर असून नवी दिल्लीत दाखल झाले

सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’चे कामकाज ठप्प !

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे कामकाज सध्या ठप्प झाले

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या