Friday, July 11, 2025

करूळ-गगनबावडा घाटातील वाहतूक सुरू

करूळ-गगनबावडा घाटातील वाहतूक सुरू
सिंधुदुर्ग (हिं.स.) : सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जोडणाऱ्या करूळ-गगनबावडा घाटात अतिवृष्टीमुळे दोन ठिकाणी दरड कोसळल्यान ये - जा करणारी दोन्ही बाजूकडील वाहतूक आज सायंकाळी ठप्प झालेली होती.

जवळपास एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात पोलीस आणि प्रशासनाला यश आल आहे. महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांच्यासह पोलीस यंत्रणेने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

महामार्ग प्राधिकरण खारेपाटण विभागाचे अधिकारी आणि वैभववाडी पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले असून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >