रत्नागिरी (हिं.स.) : गणेशोत्सवात मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात आपापल्या गावी जातात. याच दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने गणेशोत्सवात अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या जादा गाड्यांचे वेळापत्रक असे – मुंबई सेंट्रल – ठोकूर – मुंबई सेंट्रल (साप्ताहिक) विशेष गाड्या – मुंबई सेंट्रल – ठोकूर (साप्ताहिक) विशेष मुंबई सेंट्रल येथून मंगळवारी २३, ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता ठोकूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी ठोकूरहून मुंबई सेंट्रलकरिता बुधवार, २४ आणि ३१ ऑगस्ट तसेच ७ सप्टेबर रोजी रात्री १०.४५ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी मुंबई सेंट्रलला सकाळी ७ वाजता पोहोचेल.
मुंबई सेंट्रल – मडगाव जं. – मुंबई सेंट्रल (मंगळवार व्यतिरिक्त दररोज) विशेष गाड्या – या विशेष गाड्या मुंबई सेंट्रल येथून २४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या काळात सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री १२ वाजता सुटेल. ट्रेन मडगाव जंक्शनला दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेचार वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २५ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत बुधवारव्यतिरिक्त दररोज सकाळी ९.१५ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटेपूर्वी १ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.
वांद्रे – कुडाळ – वांद्रे साप्ताहिक विशेष गाडी गुरुवारी, २५ ऑगस्ट आणि १ तसेच ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी कुडाळला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी शुक्रवारी, २६ ऑगस्ट, २ आणि ९ सप्टेंबरला सकाळी पावणेसात वाजता सुटेल आणि रात्री साडेनऊ वाजता वांद्रे येथे पोहोचेल.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…