Friday, May 9, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

राज्यात २३८२ कोरोना बाधित रुग्णांचे निदान, एकूण १५५२१ ॲक्टिव्ह रुग्ण

राज्यात २३८२ कोरोना बाधित रुग्णांचे निदान, एकूण १५५२१ ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई (हिं.स.) : राज्यात आज २३८२ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर आठ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज रोजी एकूण १५५२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


आज २८५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७८,५३,६६१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९६% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२५,९९,५२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,१७,२०५ (०९.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.


राज्यात बी ए.४ आणि बी ए.५ व्हेरीयंटचे ३५ रुग्ण तर बी ए.२.७५ चे ८ रुग्ण


बी जे वैद्यकीय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बी ए. ४ चे ४ तर बी ए.५ चे ३१ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय बीए.२.७५ व्हेरीयंटचे देखील ८ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत. या नमुन्यांची तपासणी पुणे आणि मुंबई येथील इन्साकॉग अंतर्गत प्रयोगशाळांमध्ये करण्यात आले आहे. हे सर्व नमुने दिनांक ३१ मे ते ३० जून २०२२ या काळातील आहेत. या रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या ११३ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या ४० झाली आहे.


जिल्हा निहाय बी ए. ४ आणि ५


पुणे -६५, मुंबई -३३, नागपूर ठाणे पालघर - प्रत्येकी ४, रायगड - ३


जिल्हा निहाय बी ए.२.७५ 


पुणे -२०, नागपूर -१४, अकोला - ४ , ठाणे यवतमाळ - प्रत्येकी १

Comments
Add Comment