मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे निर्णय फिरवण्याची मालिका सुरु ठेवली आहे.
याआधी भाजप-सेनेच्या युतीने घेतलेले निर्णय मविआ सरकारने बदलले होते. मात्र, सत्तेत येताच आता शिंदे आणि फडणवीस यांनी मविआ सरकारने घेतलेले सर्व निर्णय पुन्हा फिरवले आहेत.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २९ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ठाकरे सरकारच्या इतर निर्णयांप्रमाणं औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार अल्पमतात आल्यानंतर हे निर्णय घेतल्याने आक्षेप घेतला होता.