साखरपुडा नाही 'मज्जा' केल्याचा सुष्मिताचा खुलासा

  138

मुंबई : ललित मोदींच्या पोस्टनंतर सुष्मिता सेन हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात तिने लग्न किंवा साखरपुडा केला नसल्याचा खुलासा केला आहे.


माजी आयपीएल चेअरमन आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले ललित मोदी वयाच्या ५६व्या वर्षी सुष्मिता सेनसोबत विवाह बंधनात अडकणार असल्याचे संकेत त्यांनी ट्विट द्वारे दिले आहेत. त्यावर सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगल्या असतानाच आता सुष्मिता सेन हिने इंस्टाग्रामवर हा खूलासा केला आहे.





ललित मोदी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपची माहिती चाहत्यांना दिली आहे. आता सुष्मिताने या पोस्टवर रिअॅक्शन दिली आहे.


"मी सध्या आनंदी आहे. मी लग्न केलेले नाही. साखरपुडा देखील केला नाही. सध्या मी प्रेमळ माणसांच्या सानिध्यात आहे. हे माझे स्पष्टीकरण, आता तुम्ही स्वत:चे आयुष्य जगा आणि काम करा. माझा आनंद शेअर केल्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी शेअर केला नाही त्यांच्यासाठी 'None of Your Business", असे कॅप्शन सुष्मिताने या पोस्टला दिले आहे. सुष्मिताच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे.


सुष्मिता सेन आणि ललित मोदी नुकतेच मालदिव आणि सार्डिनिया येथे फिरायला गेले होते. तिकडे त्यांनी खूप मजा केली. ललित मोदी लंडनमध्ये पोहचल्यानंतर ट्विट करत त्यांनी सुष्मिता सेनसोबतच्या नात्यांची माहिती दिली.


https://twitter.com/LalitKModi/status/1547672999737798658

दरम्यान, सुष्मिताचा भाऊ राजीव सेनला ललित मोदी आणि सुष्मिता यांच्या नात्याबाबत विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला की, मी खुश आहे आणि हैराण देखील. मी काही बोलण्याआघी माझ्या बहिणीसोबत चर्चा करेन. मला याबाबत काहीच माहित नाही. माझ्या बहिणीने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे मी यावर काही कमेंट करणार नाही.

Comments
Add Comment

मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, ओबीसी नेत्यांसोबत आज घेणार महत्वपूर्ण निर्णय

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारचे

Maratha Reservation : मराठा आरक्षण मुद्यावर मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर खलबत! मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महत्वाची बैठक

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कडक आमरण उपोषणाला बसणार

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादाच्या भोवऱ्यात! जनसामान्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप

मुंबई: संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, राज्यभरातून अनेक लोकं या दिवसात मुंबईत लालबागच्या

आता आणखी किती दिवस?' ऋषभ पंतने सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने आपल्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा लालबाग राजाच्या दर्शनाला : देशाच्या प्रगतीसाठी केली प्रार्थना

मुंबई : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी रविवारी मुंबईतल्या गणेश मंडळांना भेट दिली . मुख्यमंत्री देवेंद्र