Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीसाखरपुडा नाही 'मज्जा' केल्याचा सुष्मिताचा खुलासा

साखरपुडा नाही ‘मज्जा’ केल्याचा सुष्मिताचा खुलासा

मुंबई : ललित मोदींच्या पोस्टनंतर सुष्मिता सेन हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात तिने लग्न किंवा साखरपुडा केला नसल्याचा खुलासा केला आहे.

माजी आयपीएल चेअरमन आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले ललित मोदी वयाच्या ५६व्या वर्षी सुष्मिता सेनसोबत विवाह बंधनात अडकणार असल्याचे संकेत त्यांनी ट्विट द्वारे दिले आहेत. त्यावर सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगल्या असतानाच आता सुष्मिता सेन हिने इंस्टाग्रामवर हा खूलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

ललित मोदी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपची माहिती चाहत्यांना दिली आहे. आता सुष्मिताने या पोस्टवर रिअॅक्शन दिली आहे.

“मी सध्या आनंदी आहे. मी लग्न केलेले नाही. साखरपुडा देखील केला नाही. सध्या मी प्रेमळ माणसांच्या सानिध्यात आहे. हे माझे स्पष्टीकरण, आता तुम्ही स्वत:चे आयुष्य जगा आणि काम करा. माझा आनंद शेअर केल्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी शेअर केला नाही त्यांच्यासाठी ‘None of Your Business”, असे कॅप्शन सुष्मिताने या पोस्टला दिले आहे. सुष्मिताच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सुष्मिता सेन आणि ललित मोदी नुकतेच मालदिव आणि सार्डिनिया येथे फिरायला गेले होते. तिकडे त्यांनी खूप मजा केली. ललित मोदी लंडनमध्ये पोहचल्यानंतर ट्विट करत त्यांनी सुष्मिता सेनसोबतच्या नात्यांची माहिती दिली.

दरम्यान, सुष्मिताचा भाऊ राजीव सेनला ललित मोदी आणि सुष्मिता यांच्या नात्याबाबत विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला की, मी खुश आहे आणि हैराण देखील. मी काही बोलण्याआघी माझ्या बहिणीसोबत चर्चा करेन. मला याबाबत काहीच माहित नाही. माझ्या बहिणीने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे मी यावर काही कमेंट करणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -