Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीराज्यात पावसामुळे आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू

राज्यात पावसामुळे आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने राज्याच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली. या पावसात आतापर्यंत ९९ जणांचा बळी गेला आहे तर १८१ जनावरं दगावली आहेत. तर आजवर ७ हजार ९६३ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

आज पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतही पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यामुळे लोकल वाहतूक आणि रस्ते मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.

तिकडे गुजरातमध्येही पावसाने विश्रांती घेतल्याने पूर ओसरला आहे. परिणामी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे या मार्गावर बंद असलेली वाहतूक पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

खबरदारी म्हणून विविध जिल्ह्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं तैनात

दरम्यान, मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे. पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये या आधीच तैनात केल्या आहेत. राज्यात विविध जिल्ह्यात एकूण १४ एनडीआरएफ आणि ६ एसडीआरएफ पथकं तैनात आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -