नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी १८ जुलैपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल संसदेत काही असंसदीय शब्दांवर बंदी घातल्यानंतर आता आणखी एक नवा आदेश लोकसभा सचिवालयाने खासदारांना दिला आहे. संसद भवन परिसरात निदर्शने, आंदोलने, उपोषण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच संसद भवन परिसरात कोणतीही धार्मिक कृती करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या आधी लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांसाठी असंसदीय शब्दांची यादी जाहीर करण्यात आली होती. या असंसदीय शब्दांना लोकसभा आणि राज्यसभेत वापरणे असंसदीय मानले जाणार आहे. लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्द २०२१ या शीर्षकासह ही यादी प्रकाशित करण्यात आली आहे.