बेस्टच्या डिजिटल तिकिटाला प्रवाशांची पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाने डिजिटल सिस्टमवर अधिक भर दिला असून बेस्टने डिजिटल तिकीट सेवा सुरू केली आहे. गेल्या पाच महिन्यांत ६० टक्के प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.


बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढणे तसेच प्रवाशांना अत्याधुनिक सेवा पुरवणे यासाठी बेस्टने ऑटोमॅटिक सिस्टमवर अधिक भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून बेस्टने डिजिटल सेवा सुरू केली. बेस्टचे 'चलो' सारखी स्मार्ट कार्ड सेवा प्रवाशांच्या पसंतीला उतरत आहे. बेस्टचे १२ टक्के प्रवासी 'चलो' अॅपचा वापर करतात.


बेस्टने स्मार्ट कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन सेवा देण्यावरही भर दिला आहे. यात डिजिटल तिकीटिंगमुळे प्रवाशांना घरबसल्या सेवा मिळत असून प्रवाशांना ऑनलाइन रिचार्जची सुविधाही उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये होणारा सुट्ट्या पैशांचा वादही संपला. डिजिटल सेवेचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढत असून गेल्या पाच महिन्यांत ६० टक्के म्हणजे १८ लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी या सोयीचा वापर केला आहे.

Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम