मुंबई (हिं.स.) : आगामी १८ जुलैपासून सुरू होणारे राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. संसदीय कार्य विभागाने कळविल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र विधिमंडळाने अधिकृत पत्रक काढून यासंदर्भातील माहिती दिली आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख २०२२ च्या प्रथम सत्राच्या शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार १८ जुलै पासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार होते. पण संसदीय कार्य विभागाच्या सूचनेनूसार हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे.
पण अधिवेशनाची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नसून संसदीय कार्य विभागाने कळवल्यानंतर पुढची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे विधिमंडळाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.