Wednesday, April 30, 2025

देशमनोरंजनमहत्वाची बातमी

१० अफेअर्स आणि ब्रेकअप नंतर अखेर 'ही' मिस युनिव्हर्स लग्न करणार?

१० अफेअर्स आणि ब्रेकअप नंतर अखेर 'ही' मिस युनिव्हर्स लग्न करणार?

मुंबई : माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांनी लग्नाची घोषणा करुन सर्वांना चकित केले आहे. मिस युनिव्हर्सपासून बॉलिवूडपर्यंत आपली छाप सोडलेल्या सुष्मिताचे वैयक्तिक आयुष्यही काहीसे फिल्मी वाटावे, असेच आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सुष्मिताच्या अफेअर्सची मालिका सुरु झाली. एक दोन नव्हे तर तब्बल १० अफेअर्स आणि ब्रेकअप झालेल्या सुष्मिताचे लेखक-दिग्दर्शक विक्रम भटसोबत दस्तक चित्रपटापासून नाव जोडले गेले. त्यानंतर याच चित्रपटातील मॉडेल रोहमन शॉलसोबतही सुष्मिताचे नाव जोडले गेले. नुकतेच अफेअर्समध्ये आपण तीन वेळा लग्नापर्यंत पोहोचले होते, असे सुष्मिताने एका मुलाखतीत कबुल केले आहे. मात्र, काही कारणास्तव लग्न होऊ शकले नाही, असे सुष्मिताने सांगितले.

याआधी सुश्मिता सेनचे लग्न ३ वेळा मोडले.. पण का?

आता माजी आयपीएल चेअरमन आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले ललित मोदी वयाच्या ५६व्या वर्षी सुष्मिता सेनसोबत विवाह बंधनात अडकणार आहेत. असे संकेत त्यांनी ट्विट द्वारे दिले आहेत.

https://twitter.com/LalitKModi/status/1547595996363780096

वयाच्या १८व्या वर्षी मिस इंडिया आणि १९व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनलेली सुष्मिता तिच्या पहिल्या चित्रपटापासूनच तिच्या प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत आहे. सुष्मिता सेनचा १९९६ मध्ये आलेला पहिला चित्रपट 'दस्तक'चे लेखक विक्रम भट होते. तेव्हा या दोघांचे नाव जोडले गेले होते. अनेक वर्षे दोघांमध्ये अफेअर असल्याची चर्चा होती. १९९६ पासून सुरू झालेली सुष्मिताच्या अफेअर्सची मालिका २०२१ मध्ये रोहमन शॉलसोबत ब्रेकअप होईपर्यंत सुरू राहिली.

https://twitter.com/LalitKModi/status/1547672999737798658

सुष्मिता आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच अधिक चर्चेत राहिली. दोन मुली दत्तक घेतल्याबद्दल तिच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला. मात्र, पत्रकारांचा लग्नाचा प्रश्न तिने नेहमीच टाळला. जाणून घेऊया सुष्मिताच्या आयुष्यातील अशाच काही गोष्टींबद्दल...

वडील हवाई दलात होते

सुष्मिताचा जन्म १९ नोव्हेंबर १९७५ रोजी बंगाली बैद्य कुटुंबात झाला. हैदराबादमध्ये जन्मलेल्या सुष्मिताचे वडील सुबीर सेन हे भारतीय हवाई दलात विंग कमांडर होते. आई शुभ्रा सेन ज्वेलरी डिझायनर होत्या. सुष्मिताचे सुरुवातीचे शिक्षण हैदराबादमध्येच झाले. त्यानंतर एअरफोर्स गोल्ड ज्युबिली इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली येथून तिने पदवी मिळवली. याचदरम्यान तिने मॉडेलिंगमध्येही पदार्पण केले.

मॉडेलिंग करत असतानाच सुष्मिता १९९४ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली. या स्पर्धेत ऐश्वर्या रायही एक स्पर्धक म्हणून म्हणून सहभागी झाली होती. पण, सुष्मितानेच फेमिना मिस इंडियाचा किताब पटकावला. त्यावेळी ऐश्वर्याला काही गुणांनी पराभव पत्करावा लागला होता. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या असल्याने सुष्मिताला या स्पर्धेत सहभागी व्हायचे नव्हते. मात्र, तरीही काही लोकांनी आग्रह धरल्यान ती या स्पर्धेत सहभागी झाली. ऐश्वर्याला प्रबळ स्पर्धक मानले जात होते. तर, सुष्मिताला अंडरडॉग म्हटले जात होते. अखेर सुष्मिताने ऐश्वर्याला हरवून मिस इंडियाचा ताज पटकावला. पुढे सुष्मिता मिस युनिव्हर्स बनली तेव्हा ऐश्वर्यानेदेखील मिस वर्ल्डचा किताब जिंकला.

१९९४ मध्ये सुष्मिताने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर आपल्या चित्रपटात सुष्मिताला साईन करण्यासाठी निर्मात्यांनी तिच्या घरासमोर रांग लावली. मोठमोठ्या दिग्दर्शक-निर्मात्यांना आपल्या चित्रपटातून सुष्मिताला लॉंच करायचे होते. अखेर सुष्मिताने महेश भट यांच्या चित्रपटाची ऑफर स्वीकारली. महेश भट तेव्हा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक मानले जात होते. दस्तक असे या चित्रपटाचे नाव होते. वेड्या प्रियकराची ही कथा होती. येथूनच सुष्मिताचा चित्रपट प्रवास सुरु झाला.

दोन मुलींची आई

सुष्मिता सेनने वयाच्या २४व्या वर्षी आपली पहिली मुलगी रेनीला दत्तक घेतले. सुष्मिताचा हा निर्णय हा खूप धाडसी होता. कारण तेव्हा सुष्मिता बॉलिवूडमध्ये स्वत:ला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या खात्यावर काही हिट तर काही फ्लॉप चित्रपट होते. काही चित्रपटात तिला सहायक नायिका म्हणून घेण्यता आले होते. अशात सुष्मिताने रेनीला दत्तक घेतले. त्यानंतर दुसरी मुलगी अलिशाला सुष्मिताने १० वर्षांनी दत्तक घेण्यात आली.

अफेअर्स आणि ब्रेकअप

विक्रम भट्ट : मिस युनिव्हर्स बनल्यानंतर सुष्मिताचे नाव सर्वप्रथम चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांच्याशी जोडले गेले. दस्तक (१९९६) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुष्मिता आणि विक्रम जवळ आले होते. काही काळ रिलेशनशिपनंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

रणदीप हुड्डा : रणदीप हुड्डा सुष्मितासोबतच्या अफेअरमुळेही एकेकाळी चर्चेत होता. कर्मा, कन्फेशन आणि होली या चित्रपटात एकत्र काम करताना दोघे जवळ आले.

वसीम अक्रम : २०१३ मध्ये सुष्मिताचे माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमसोबत अफेअर असल्याच्या बातम्याही चर्चेत होत्या. दोघेही लग्न करणार असल्याचे बोलले जात होते, मात्र सुष्मिताने हे वृत्त फेटाळून लावले.

हृतिक भसीन: २०१५ च्या आसपास, सुष्मिता मुंबईतील रेस्टॉरंट मालक हृतिक भसीनसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली होती. दोघेही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते.

मुदस्सर अझीझ: दिग्दर्शक मुदस्सर अझीझ हे देखील अशा लोकांपैकी एक होते ज्यांचे सुष्मिताशी अफेअर होते. सुष्मिताने दिग्दर्शक म्हणून मुदस्सरचा पहिला चित्रपट ‘दुल्हा मिल गया’मध्येही काम केले होते, जो फ्लॉप ठरला होता.

रोहमन शॉल : सुष्मिता सेनने रोहमन शॉलला अडीच वर्षे डेट केले. रोहमन आणि सुष्मिता यांच्या वयात १५ वर्षांचा फरक आहे. सुष्मिता ४६ वर्षांची आहे. रोहमन ३० वर्षांचा आहे. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. रोहमनचे सुष्मिताच्या दोन मुली रेनी आणि अलिशा यांच्याशीही चांगले संबंध आहेत.

याशिवाय सुष्मिताचे नाव अनेक लोकांशी जोडले गेले. यामध्ये टॅलेंट हंट कंपनीचे मालक बंटी सचदेव, उद्योगपती इम्तियाज खत्री, हॉटमेलचे संस्थापक साबीर भाटिया, व्यापारी संजय नारंग यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment