Wednesday, July 9, 2025

इंधन दरात करकपात: पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

इंधन दरात करकपात: पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

मुंबई : मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्य सरकारकडून इंधन दरात करकपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त होणार आहे.


यामुळे सरकारच्या तिजोरीवर ६ हजार कोटींचा भार पडणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिंदे-फडणवीस सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीत हा मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातील जनतेला आणि मालवाहतूकदारांनाही दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment