नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहात शब्दांच्या वापराबाबत जारी करण्यात आलेल्या यादीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. लोकसभा सचिवालयाने शब्दांची एक लांबलचक यादी जारी केली आहे, जी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात असंसदीय मानली जाईल. मात्र लोकसभा सचिवालयाच्या निर्णयावर विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावर एक स्पष्टीकरण दिले आहे. 1959 सालापासून सुरू असलेली ही लोकसभेची प्रक्रिया असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, ‘या प्रक्रियेनुसार, जेव्हा-जेव्हा एखादा सदस्य संसदेत चर्चेदरम्यान अयोग्य शब्द वापरतो, तेव्हा पीठासीन अधिकारी तो शब्द असंसदीय घोषित करतात. आम्ही ते सर्व शब्द संकलित करतो. यापूर्वी त्याचे पुस्तक काढण्यात आले होते, परंतु यावेळी कागदाचा वापर कमी करण्यासाठी ही यादी ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आली आहे.’
लोकसभा अध्यक्ष पुढे म्हणाले की, ‘कोणत्याही शब्दावर बंदी घालण्यात आलेली नाही. याआधी 1954, 1986, 1992, 1999, 2004, 2009 या वर्षातही अनेक शब्दांचे संकलन करण्यात आले होते. 2010 नंतर हे संकलन दरवर्षी येऊ लागले आहे. कोणत्याही सदस्याचा बोलण्याचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, पण सभ्य भाषेत चर्चा व्हायला हवी,’ असेही बिर्ला म्हणाले.
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…