Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रगुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी घेतले साईंचे दर्शन

गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी घेतले साईंचे दर्शन

शिर्डी (प्रतिनिधी) : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर गुजरातसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या पालखीतील साईभक्तांच्या साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली होती.

आज उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाली. काकड आरतीनंतर ‘श्री साईसच्चरित’ या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. या मिरवणुकीत संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी पोथी, संस्थानचे उपाध्यक्ष अॅड. जगदीश सावंत व विश्वस्त सचिन कोते यांनी प्रतिमा, विश्वस्त अविनाश दंडवते यांनी विणा घेऊन सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे विश्वस्त सर्वश्री अॅड.सुहास आहेर, सचिन गुजर, जयंतराव जाधव, महेंद्र शेळके, डॉ. एकनाथ गोंदकर, डॉ.जालिंदर भोर, नाशिक प्राप्तिकर विभागाचे सहआयुक्त संजय धिवरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी ६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान झाले. सकाळी ७ वाजता गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विश्वस्त महेंद्र शेळके व त्यांच्या पत्नी सुरेखा शेळके यांनी सहपरिवार श्रींची पाद्यपूजा केली. गुजरातसह राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, अंधेरी, वसई, पालघर, अलिबाग, विरार, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, गेवराई, नांदेड आदी ठिकाणाहून आलेल्या पालखीतील साईभक्तांच्या साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -