Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीकोल्हापूरातील ५८ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूरातील ५८ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पुराचे पाणी पुलांवरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी रस्ते, महामार्ग बंद झाले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राधानगरी धरणात १४४.५६ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगांव व तारळे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव, कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगांव, सरुड पाटणे व कोपार्डे, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे, गारगोटी, शेणगांव व शेळोली, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, हिंडगांव, तारेवाडी व अडकूर, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी, शिगांव, खोची, चावरे व दानोळी, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली व सुळंबी, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडूकली, तुळशी नदीवरील- बीड व आरे, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी व चंदगड, धामणी नदीवरील- सुळे, पणुंद्रे व आंबर्डे, हिरण्यकेशी नदीवरील- निलजी असे ५८ बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 144.56 दलघमी, तुळशी 58.98 दलघमी, वारणा 609.98 दलघमी, दूधगंगा 368.73 दलघमी, कासारी 55.82 दलघमी, कडवी 46.82 दलघमी, कुंभी 46.32 दलघमी, पाटगाव 62.52 दलघमी, चिकोत्रा 26.70 दलघमी, चित्री 30.37 दलघमी, जंगमहट्टी 22.48 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, आंबेआहोळ 28.08 जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 36.10 फूट, सुर्वे 35.1 फूट, रुई 65 फूट, इचलकरंजी 60.6 फूट, तेरवाड 55.3 फूट, शिरोळ 47.9 फूट, नृसिंहवाडी 47.6 फूट, राजापूर 35.9 फूट तर नजीकच्या सांगली 19.3 फूट व अंकली 24.2 फूट अशी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -