तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने परराष्ट्र धोरणात सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आम्ही सुरक्षेला नेहमीच प्राधान्य देत असतो. खरे तर आमच्या परराष्ट्र धोरणात ‘सुरक्षा’ ही प्रथम क्रमांकाची प्राथमिकता आहे, असे स्पष्ट मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केले.
एस जयशंकर यांनी अलीकडंच बाली इथे झालेल्या जी-२० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या वेळी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली होती. दरम्यान, दोन्ही बाजूंनी सीमेचा प्रश्न लवकरात-लवकर सोडवण्यासाठी चर्चा झाल्याचे कळत आहे.
२०२० मधील गलवान संघर्षानंतर अडथळे सोडवण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. १५ आणि १६ जूनच्या मध्यरात्री गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले होते. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चिनी लष्करी कारवाईच्या विरोधात संघर्ष सुरू झाला.