Wednesday, July 24, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणमराठी माणसांनी उद्योजक होण्याची मानसिकता ठेवली पाहिजे; नारायण राणे

मराठी माणसांनी उद्योजक होण्याची मानसिकता ठेवली पाहिजे; नारायण राणे

नवी मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील मराठी माणसांनी उद्योजक होण्याची मानसिकता ठेवली पाहिजे आणि त्यासाठी रितसर प्रशिक्षण घेऊन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम खात्याकडे आल्यास त्यांची प्राधान्याने कामे केली जातील, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठी उद्योजकांना दिले. सॅटर्डे क्लबच्या वतीने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात मराठी उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राणे यांनी आपले मत व्यक्त केले.

सूक्ष्म, लघू आणि मध्यम मंत्रालयाचा कारभार सांभाळून आज एक वर्ष उलटले. जेव्हा सॅटर्डे क्लबचे सदस्य मला भेटण्यास आले, तेव्हा मी एक मराठी उद्योजकाच्या प्रतीक्षेत होतो. मात्र आज प्रत्यक्षात यांनी हजारो मराठी उद्योजक तयार केल्याचे पाहून अतिशय आनंद झाला आहे. त्यामुळे सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून सुरू केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून आज उपयुक्त आहे, अशी शाबासकीची थाप यावेळी राणे यांनी आयोजकांना दिली.

राजकीय जीवनात आज ३३ वर्षं काम करत असताना कुणा मराठी माणसाचे काम आले, तर ते पाहिजे केले पाहिजे, अशीच भावना ठेवत आलो आहे. त्यामुळे मराठी माणसाने मराठी माणसाची आपुलकीने वागले पाहिजे, काही अडचणी असतील प्रश्न केले पाहिजेत आणि एकमेकांना सहाय्य करून पुढे नेले, तर असे कार्यक्रम भरवण्याची गरजच लागणार नाही, असे मत ही राणे यांनी व्यक्त केले. सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग हे खात माझ्याकडे आहे. एका उद्योजकाच्या प्रतीक्षेत होतो. पण, या ठिकाणी खूप सारे उद्योजक आहेत. हा उपक्रम उपयुक्त आहे. मराठी माणसाने उद्योजक व्हायची हिंमत केली पाहिजे. जे प्रशिक्षण घेतील, त्यांना कामांमध्ये प्राधान्य दिले जाईल. काम केलेच पाहिजे, हा माझा धर्म आहे. माझे कर्तव्य मी निभावणार. रोज शपथा घेऊन चालत नाही. त्या मनापासून केल्या पाहिजेत. मराठी माणसाने अनेक गोष्टी इतर भाषिकांकडून शिकल्या पाहिजेत. पैसा मिळवा. मग स्वतंत्र व्यवसाय करा. चेंबूरला व्यवसायिकांचे गुण मी पाहिले. व्यवसायासाठी गोड बोलता आलं पाहिजे. देशात सहा कोटी तीस लाख उद्योजक आहेत. त्यात मराठीचा टक्का कमी आहे. तो वाढविणे गरजेचे असल्याचे नारायण राणे यांनी कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

यावेळी क्लबच्या माध्यमातून मराठी उद्योजकांच्या मागणीचे एक निवेदन राणे यांना देऊन दिल्लीत भेटण्याची वेळ मागण्यात आली. यावेळी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आणि संचालक अशोकराव दुगाडे, उद्योजक सतीश हावरे, मनोज पाटील, संतोष पाटील, रमदास माने, अतुल अत्रे, श्रीकृष्ण पाटील यादी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -