Thursday, October 23, 2025
Happy Diwali

कन्हैय्यालालच्या मुलांना मिळणार सरकारी नोकरी

कन्हैय्यालालच्या मुलांना मिळणार सरकारी नोकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानच्या उदयपुरमध्ये २८ जून रोजी झालेल्या घटनेमध्ये कन्हैय्यालाल नावाच्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. नुपूर शर्मा प्रकरणाशी या हत्येचा संबंध जोडला जात होता. या व्यक्तीच्या मुलांना आता सरकारी नोकरी देण्यात आली आहे.

राज्य सरकारने ही घोषणा केली असून याबद्दलचा आदेशही जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार कन्हैय्यालालची दोन्ही मुले यश आणि तरुण यांना उदयपूरमधल्या कोष कार्यालयात कनिष्ठ सहाय्यक पदावर भरती करुन घेण्यात आले आहे. या दोघांनाही एक महिन्यामध्ये कामावर येण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकारी ताराचंद मीना यांनी हे आदेश दिले आहे. यामध्ये काही अटीही घालण्यात आल्या आहे.

कामावर रुजू झालेल्या दिवसापासून दोन वर्षे हे दोघेही प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतील. या काळात त्यांना १४६०० रुपये पगार मिळेल आणि त्यानंतर २,४०० ग्रेड पेनुसार पगार मिळेल. प्रशिक्षण काळात या दोघांना महागाई भत्ता, विशेष वेतन, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, बोनस अशा प्रकारच्या कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत. या काळात या दोघांच्या राज्य विम्यात कोणतीही कपात केली जाणार नाही. प्रशिक्षण काळ पूर्ण झाल्यानंतर पगारवाढीसाठी यांना परीक्षा द्यावी लागेल. नाहीतर त्यांची नोकरी जाईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा