मुंबई : १८ वर्षांवरील नागरिकांना पुढील ७५ दिवसांसाठी बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची घोषणा केली आहे. १५ जुलैपासून पुढील ७५ दिवसांपर्यंत १८ वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारत सध्या ७५वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. याला देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने १५ जुलै २०२२ पासून पुढील ७५ दिवस १८ वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत आणि त्यांना दोन्ही डोस घेऊन सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल त्या व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना जवळच्या लसीकरण केंद्रावर बूस्टर डोससाठी नोंदणी करु शकतात.