Sunday, April 20, 2025
Homeक्रीडागोलंदाजांमध्ये बुमराह अव्वल स्थानी

गोलंदाजांमध्ये बुमराह अव्वल स्थानी

आयसीसीने जाहीर केली एकदिवसीय गोलंदाजांची क्रमवारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगळवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर वर्चस्व गाजविणाऱ्या भारताच्या जसप्रीत बुमराहने आयसीसीच्या एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. बुमराहने न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. बुमराहच्या नावावर ७१८ गुण असून बोल्टच्या नावे ७१२ गुण आहेत.

या क्रमवारीत पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी तिसऱ्या तर जोश हेझलवुड चौथ्या स्थानी आहे. टॉप-१० गोलंदाजांमध्ये बुमराह हा भारताचा एकमेव गोलंदाज आहे. मुजिब उर रेहमान, मेहिदी हसन मिराज हे अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानी आहेत. ख्रिस वोक्स, मॅट हेन्री, मोहम्मद नबी, राशिद खान हे अनुक्रमे सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.

भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात बुमराहने अप्रतिम अशी गोलंदाजी करत ७.२ षटकांमध्ये १९ धावा देत ६ बळी मिळवले. या कामगिरीच्या जोरावर तो पुन्हा एकदा एकदिवसीय गोलंदाजांच्या आयसीसी रँकिंगमध्ये अव्वलस्थानी पोहोचला आहे. बुमराहला फेब्रुवारी, २०२० मध्ये न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टने पहिल्या स्थानावरून हटवत अव्वलस्थान मिळवले. त्याआधी दोन वर्षे तब्बल ७३० दिवस बुमराह अव्वल स्थानी होता. इतके दिवस एक नंबरला असणारा बुमराह पहिला भारतीय तर क्रिकेट इतिहासातील नववा गोलंदाज ठरला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -