Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीपुराच्या पाण्यातून नदी पार करणे बेतले जीवावर, स्कॉर्पिओ बुडाली, तीघांचा मृत्यु तर...

पुराच्या पाण्यातून नदी पार करणे बेतले जीवावर, स्कॉर्पिओ बुडाली, तीघांचा मृत्यु तर ३ जण बेपत्ता

नागपूर (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यामधील केळवद पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या नांदागोमुख छत्रापूर वरील ब्राम्हणमाळी पुलावरून स्कार्पीओ टाकल्याने गाडीतील ६ जण वाहुन गेले आहेत. बचाव कार्यात आतापर्यत तीघांचे मृतदेह हाती लागले आहेत.

यासंदर्भातील माहिती नुसार सावनेर तालुक्यातील नांदा गोमुख येथे मुलीच्या वडिलांकडे पाहुणचारासाठी आलेल्या दातार मूलताई (मध्यप्रदेश) येथील मुलाकडील आई, वडील, आत्या, बहीण व भाचा पाहुणपण आटोपून मूलताई (मध्यप्रदेश) येथे जात असताना नांदा छत्रापूर मार्गावरील ब्राम्हणमाळी पुलावरून स्कॉर्पिओ गाडी चालकाने पुराच्या पाण्यात टाकली. पाण्याच्या प्रवाहात ६ जण वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

नांदा (गोमुख) येथील रहिवासी सुरेश ढोके यांच्या मुलीचे लग्न दातार (मध्यप्रदेश) येथील मधुकर पाटील यांच्या मुलासोबत जून महिन्यात झाले. मुलीच्या घरी घरगुती कार्यक्रम असल्याने मुलाचे वडील मधुकर पाटील, त्यांची पत्नी, मुलगी, बहीण व पुतण्या नांदा येथे आले. नांदा येथील पाहुणचाराचा कार्यक्रम पार पाडून स्कॉर्पीओने (वाहन क्र. एमएच ३१, सीपी ०२९९) परतताना नांदा येथून जवळच असलेल्या ब्राम्हणमाळी पुलावरून पुराचे पाणी पुलावरून जात असताना सुद्धा गाडी चालकाने कुठलाही विचार न करता पूल पार करण्याचा प्रयत्न केला. दुदैवाने गाडी पुलाच्या मधोमध बंद पडली. त्यावेळी त्यांनी बचावासाठी आरडाओरड केली.

पुलावरून पाणी वाहत असल्याने एक ट्रक पुलाजवळ होता. ट्रक चालकाने स्कॉर्पीओ पुलाच्यामध्ये बंद पडली हे पाहून त्याने दोर फेकला. मधुकर पाटील यांनी गाडीतून उतरून बंद पडलेल्या गाडीला दोर बांधला. परंतु पुलावरून पाणी वेगाने वाहत असल्याने दोर तुटल्याने मधुकर पाटील यांच्यासह गाडी पाण्याच्या प्रवाहात नदीत वाहून गेली. ही घटना ट्रकचालकाने गावात दूरध्वनीवरून कळविली.

लगेच घटनास्थळी नांदा गावातील नागरिक व केळवद पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले. स्कॉर्पीओ पुलापासून ४०० मीटर अंतरावर रेतीच्या गाळात अडकली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडी बाहेर काढली. तेव्हा त्यात तीन मृतदेह होते. तर इतर तिघे जण पुराच्या प्रवाहात वाहून गेले होते. मृतकांमध्ये मधुकर पाटील (वय ६५), निर्मला मधुकर पाटील (वय ५५), निमू आठनेरे (वय ४५, रा.मूलताई), रोशनी नरेंद्र चौकीदार (वय ३२ रा. झिंगाबाई टाकळी, नागपूर), दर्श नरेंद्र चौकीदार (वय १०) व चालक लीलाधर डिवरे (३८ रा. झिंगाबाई टाकळी नागपूर) यांचा समावेश असून निमू आठनेरे, रोशनी चौकीदार व मधुकर पाटील यांचे मृतदेह सापडले असून लीलाधर डिवरे, दर्श चौकीदार व निर्मला पाटील बेपत्ता असून शोधकार्य सुरु आहे.

नागपूर विभागात सरासरी ३१.५ मिमी पाऊस

नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी ३१.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यात १५३.१, सिरोंचा ८९.१ मिमी, चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात १०६.८, बल्लारपूर १०१.८, चंद्रपूर ८९.६, पोंभुर्णा ८१.८ आणि कोरपना ६६.३ मि.मी. तसेच गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात ६५.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -