Thursday, January 15, 2026

सप्तशृंगी मंदिर तब्बल ४५ दिवस राहणार बंद

सप्तशृंगी मंदिर तब्बल ४५ दिवस राहणार बंद

नाशिक (हिं.स.) : श्री भगवती स्वरुप व मूर्ती देखभाल संदर्भिय पुर्तता करण्यासाठी २१ जुलै ते ५ सप्टेंबर २०२२ या ४५ दिवसांच्या कालावधीत सप्तशृंगी गड वणी येथील श्री भगवती मंदिर बंद राहणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाकडून देण्यात आलेली आहे.

वर्ष २०१२-१३ पासून श्री भगवती स्वरुप, मुर्ती संवर्धन व देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने नियोजन सुरु असून, सद्यस्थितीत कार्यरत असलेले अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांनी शासनाच्या पुरातत्व विभाग, आय आय टी पवई (बॉम्बे) यांसह मे. अजिंक्यतारा कन्सल्टंसी, नाशिक यांच्या मार्फत संदर्भिय पुर्ततेकामी तज्ञ मार्गदर्शन प्राप्त करुन श्री भगवती स्वरुप, मुर्ती संवर्धन व देखभाल संबंधीत पुर्तता होणे दृष्टीने अंतिम निर्णय घेतला आहे.

त्यानुसार श्री भगवती स्वरुप, मुर्ती संवर्धन व देखभाल अनुषंगीक पुर्ततेसाठी गुरुवार २१ जुलै पासून पुढील ४५ दिवस श्री भगवती मंदिर भाविकांसह सर्वांना प्रत्यक्ष दर्शनासाठी संपुर्णत: बंद राहणार आहे. मात्र विश्वस्त संस्थेच्या पहिली पायरी येथे असलेल्या उपकार्यालय नजीक श्री भगवतीची हुबेहुब प्रतिकृती भाविकांच्या पर्यायी दर्शनाची व्यवस्था म्हणून कार्यरत केली जाणार आहे. तसेच भाविकांना दिल्या जाणाऱ्या महाप्रसाद, भक्तनिवास व इतर अनुषंगीक सुविधा या सातत्यपूर्वक कार्यरत असणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >