नागपूर (हिं.स) : नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावित नूतन कायापालट योजना-कार्यक्रमावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आनंद व्यक्त केला. प्रस्तावित आकृतीची रचना प्रदर्शित करीत ट्वीटर द्वारे नितीन गडकरी म्हणाले.
नूतन भारताची अविश्वसनीय पायाभूत सुविधा
नागपूर रेल्वे स्थानकाला लवकरच प्रस्तावित कायाकल्प लाभणार आहे. स्थानकात आणि आसपासच्या सामाजिक-आर्थिक विकासासह प्रवाशांना जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव लाभेल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जी यांच्या प्रयत्नांचे कौतुक.
Incredible Infrastructure of #NewIndia
Nagpur Railway Station to receive a proposed makeover soon.
Commuters will experience world class travel experience with socio-economic development in & around the station.
Appreciate the efforts of Shri @AshwiniVaishnaw ji. pic.twitter.com/vYw1lVJ2cf
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 12, 2022
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत सरकार देशभरात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करून भारताचा कायापालट करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे.”