मनसे मेळावा राज ठाकरेंनी पुढे ढकलला

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी मेळावा उद्या होणार होता. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वांना निमंत्रणही दिले होते. मात्र आज एक पत्र लिहित हा मेळावा रद्द झाल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली आहे. ठाण्यातल्या रंगशारदा येथे हा मेळावा होणार होता.


राज्यातल्या पूरपरिस्थितीमुळे आपण हा निर्णय घेतल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. आपल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात की, मला तुमच्याशी बोलायचे होते, कामासंबंधी सूचना करायच्या होत्या. पण कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाने थैमान घातलेले दिसतेय. जनजीवन तर विस्कळित आहेच, पण अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो, तो सांगितला तरी प्रत्यक्षात येणे अवघड आहे. अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत.


https://twitter.com/mnsadhikrut/status/1546712159278624769

आपल्या पदाधिकाऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन करत राज ठाकरे म्हणतात, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. पण अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतोय, तिथेही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात. त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल, असे काहीही करू नका. अर्थात असे काही होऊ नये, कुठलेही नैसर्गिक संकट येऊ नये, हीच आपली इच्छा आहे. फक्त सतर्कतेसाठी सांगितले. लवकरच भेटू, असे ते आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

Comments
Add Comment

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक