Monday, May 12, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

पुणे विद्यापीठात संगणकाच्या साहाय्याने होणार उत्तरपत्रिकांची तपासणी

पुणे विद्यापीठात संगणकाच्या साहाय्याने होणार उत्तरपत्रिकांची तपासणी

पुणे (हिं.स.) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता संगणकाच्या साहाय्याने उत्तरपत्रिकांची तपासणी पद्धती (डिजिटल इव्हॅल्युएशन सिस्टिम) वापरली जाणार आहे. त्यासाठीची प्रणाली विद्यापीठाने विकसित केली असून, प्रायोगिक तत्त्वावर पदव्युत्तर स्तरापासून अंमलबजावणी करून पुढील टप्प्यात पदवीस्तर आणि संलग्न महाविद्यालयांसाठीही ही पद्धत वापरण्याचे नियोजन आहे.


पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतील सुमारे एक हजार महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. त्यामुळे पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाकडून घेतली जाते. सध्या उत्तरपत्रिकांची तपासणी केंद्रीय (कॅप) स्तरावर प्राध्यापकांकडून करण्यात येते. मात्र या प्रक्रियेत काहीवेळा त्रुटी राहतात, निकाल जाहीर होण्यास विलंब होतो.


आता विकसित तंत्रज्ञानाचा उपयोग उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्यातील काही मोजक्या विद्यापीठांमध्ये ही पद्धती वापरली जात आहे. त्यानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ऑक्टोबरपासून या पद्धतीची अंमलबजावणी विद्यापीठ संकुलातील सर्व शैक्षणिक विभागांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांपासून करण्याचे नियोजन आहे.

Comments
Add Comment