Tuesday, October 8, 2024
Homeक्रीडाबुमराहसमोर इंग्लंडची शरणागती

बुमराहसमोर इंग्लंडची शरणागती

यजमानांचा संघ ११० धावांवर सर्वबाद

द ओव्हल (वृत्तसंस्था) : जसप्रित बुमराहच्या धडाकेबाज गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी मंगळवारी शरणागती पत्करली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात २५.२ षटकांत ११० धावांवर इंग्लंडचा संपूर्ण संघ तंबूत परतला होता.

टी-२० मालिका भारताने जिंकल्यानंतर एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागली होती. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहच्या आक्रमक सुरुवातीसमोर यजमानांच्या तगड्या फलंदाजांनी नांगी टाकली. संघाच्या दुसऱ्या आणि वैयक्तिक अशा पहिल्याच षटकात बुमराहने जेसन रॉय आणि जो रुट या आघाडीच्या फलंदाजांना पॅवेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर मोहम्मद शमीही लयीत आला. त्याने बेन स्टोक्सचा अडथळा दूर करत इंग्लंडची अडचण वाढवली. इंग्लंडला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नव्हती. तेव्हाच बुमराहने जॉनी बेअरस्टो आणि लिव्हींगस्टोनला बाद करत इंग्लंडचा पाय आणखी खोलात टाकला.

जोस बटलर आणि मोईन अली ही अनुभवी आणि फलंदाजांची शेवटची मैदानात तग धरण्याचा प्रयत्न करत होती. या जोडीने २५ धावांची भागीदारी करत इंग्लंडला सावरण्याचा प्रयत्न केला. पण तो फार काळ टिकला नाही. प्रसिद्ध कृष्णाने मोईन अलीचा आपल्याच गोलंदाजीवर झेल टिपत यजमानांना सहावा धक्का दिला. त्यानंतर शमीने जोस बटलरला माघारी धाडत भारताला मोठे यश मिळवून दिले. सतराव्या षटकात क्रेग ओव्हरटनचाही संयम सुटला. हाही बळी शमीलाच मिळाला. भारताच्या या वेगवान त्रिकुटासमोर इंग्लंडचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. इंग्लंडने २५.२ षटकांत ११० धावा करून भारतासमोर अवघे १११ धावांचे लक्ष्य ठेवले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -