Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीस्पाईसजेट विमानांमागे बिघाडाची साडेसाती कायम

स्पाईसजेट विमानांमागे बिघाडाची साडेसाती कायम

२४ दिवसात विमान बिघाडाच्या नऊ घटना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या २४ दिवसात संबंधित कंपनीच्या विमानात तब्बल ९ वेळा बिघाड होण्याच्या घटना घडल्या आहेत. याचा नाहक त्रास प्रवाशांना झाला आहे. स्पाइसजेटच्या विमानांमध्ये खराबी होण्याच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाही. आजही स्पाईजजेटच्या दुबई-मदुराई बोईंग बी ७३७ विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानाच्या उड्डणाला विलंब झाला.

डीजीसीए अधिकाऱ्याने सांगितले की, व्हीटी-एसझेडके नोंदणी क्रमांक असलेल्या बोईंग बी ७३७ मॅक्स विमान मंगळुरुहून दुबईकडे जाणार होते. त्यावेळी संबंधित विमानाची पाहणी केली असता विमानाचे समोरचे चाक नेहमीपेक्षा अधिक दाबलेले दिसून आले. त्यानंतर विमानाला उड्डाण न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्पाईसजेटच्या फ्लाइटमध्ये अलीकडील काळात मोठ्या तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहेत. स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाडाची गेल्या २४ दिवसांतील ही नववी घटना आहे. वारंवार घडणाऱ्या अशा प्रकरच्या घटनामुळे ६ जुलै रोजी, डीजीसीएने स्पाइसजेटला कारणे दाखवा नोटीस देखील जारी केली होती. ज्यामध्ये कंपनी सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह हवाई सेवा स्थापन करण्यात अपयशी ठरल्याचे नमुद करण्यात आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -