नवी दिल्ली (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी नवी दिल्लीत नव्या संसद भवनाच्या छतावर बांधलेल्या राष्ट्रीय मानचिन्हाचे अनावरण झाले. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “संसद भवनाच्या छतावर उभारलेल्या राष्ट्रीय मानचिन्हाचे आज सकाळी अनावरण करण्याचा सन्मान मिळाला.”
यावेळी पंतप्रधानांनी संसद भवनाच्या उभारणीसाठी कष्ट घेणाऱ्या श्रमिकांशीही संवाद साधला. “हे संसद भवन बांधण्यासाठी कष्ट करणाऱ्या सर्व श्रमिकांशी माझा अत्यंत चांगला संवाद झाला. त्यांच्या सर्व प्रयत्नांचा आम्हाला अत्यंत अभिमान असून देशासाठी त्यांनी दिलेले योगदान आम्हाला कायम लक्षात राहील.”
हे राष्ट्रीय मानचिन्ह ब्रॉन्झपासून बनवले असून त्याचे एकूण वजन ९५०० किलोग्राम आहे. तर उंची ६.५ मीटर इतकी आहे. या मानचिन्हाला आधार देणारी, ६५०० किलोग्रामची पोलादाची रचना देखील त्याच्याभोवती बसवण्यात आली आहे. नव्या संसद भवनाच्या बरोबर मध्यावर हे मानचिन्ह बसवण्यात आले आहे.
या मानचिन्हाची संकल्पना रेखाटन आणि आणि त्यानंतर तसा आकार देऊन ते तयार करणे हे काम तसेच, मानचिन्हाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यापूर्वी आठ विविध स्तरांवर काम करण्यात आले होते. यात, क्ले मॉडेलिंग/कम्प्युटर ग्राफीकच्या माध्यमातून करण्यात आले आहे.