Friday, May 9, 2025

महामुंबईकोकणताज्या घडामोडी

बच्चे की जान लोगे क्या; नितेश राणे यांचे आदित्य ठाकरेंवर खोचक ट्वीट

बच्चे की जान लोगे क्या; नितेश राणे यांचे आदित्य ठाकरेंवर खोचक ट्वीट

मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर, कांजूरमार्ग येथे होणारे मेट्रो कारशेड पुन्हा आरेत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यादरम्यान शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल या प्रकरणी आंदोलन केले होते. दरम्यान आता हे आंदोलन आदित्य ठाकरे यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी राष्ट्रीय बालहक्क आयोगाने मुंबईच्या पोलिस आयुक्तांना नोटीस पाठवत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानंतर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता खोचक शब्दात त्यांच्यावरक टीका केली आहे.


आरे आंदोलनात सहभागी झालेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे बाळ असल्याच्या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.


https://twitter.com/NiteshNRane/status/1546479176227733512


या राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या नोटीसीनंतर भाजपचे नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत म्हणाले की, "बालहक्क संरक्षणासाठी राष्ट्रीय आयोग अद्याप लहान असलेल्या व्यक्तीला नोटीस कशी पाठवू शकतो! असा अन्याय मान्य नाही, बच्चे की जान लोगे क्या!" राणे यांनी यासोबत आयोगाने पाठवलेल्या नोटीसीचा फोटो देखील पोस्ट केला आहे.

Comments
Add Comment