Friday, May 9, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

राज्यात ११८९ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान, एकूण १८०२७ ॲक्टिव्ह रुग्ण

राज्यात ११८९ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान, एकूण १८०२७ ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई (हिं.स.) : राज्यात आज ११८९ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले. आज दोन कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज रोजी एकूण १८०२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


आज १५२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण ७८,३९,२०८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९३% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२४,०६,४२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,०५,२१३ (०९.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
Comments
Add Comment