नाशिक (हिं.स.) : सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी सुरू असून श्री क्षेत्र सप्तशृंगगड परिसरात देखील पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. पर्यायी घाट रस्ता, मंदिर परिसर व इतरत्र संततधार सुरू असून मंदिराच्या वरील भागांत व डोंगर परिसरात ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण झाली.
यावेळी एकाचवेळी पावसाचे पाणी उतरत्या पायरीवर वाहून आल्याने त्याबरोबर दगड, माती आणि झाडे येवून पायी मार्गावर मार्गक्रमण करणाऱ्या भाविकांना ट्रस्टच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने आपत्ती व्यवस्थापन टीम सोबत आवश्यक ते मदत कार्य करत सुरक्षित ठिकाणी हलवले असून कोणतीही नियंत्रण बाह्य परिस्थिती घडलेली नाही. पर्यायी भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अतिवृष्टीच्या परिस्थिती सुरक्षित प्रवासाची योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.