Share

साप्ताहिक राशिभविष्य, दि. १० ते १६ जुलै २०२२

उत्तम प्रतिसाद
मेष – आपली कार्यक्षमता भरपूर वाढणार आहे. कामात अपेक्षापेक्षा जास्त प्रगती होणार आहे. जी कामे आपली थांबली होती, होणार नाही असे वाटत होती, ती कामे होण्यास सुरुवात होईल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रलोभन टाळणे आवश्यक आहे किंवा गुंतवणूक करताना शेअर मार्केटमध्ये किंवा लॉटरी यापासून लांब राहणे आवश्यक आहे. कोणत्याही बाबतीत निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. ज्या व्यक्ती खऱ्या प्रेमाच्या शोधात होते त्यांचा शोध पूर्ण होईल. विवाह ठरविण्यास हा कालावधी चांगला आहे. नोकरी, व्यवसायातील लोकांना दिलासा मिळेल.
विरोधकांची हार
वृषभ – कामातून किंवा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न वाढणार आहे. आपली प्रतिष्ठा उंचावणार आहे. त्यातून अधिक लाभ होईल. विरोधकांची हार होणार आहे. आपल्या संपत्तीमध्ये, ज्ञानामध्ये भर पडणार आहे. आपल्या वरिष्ठांची आपल्यावर कृपादृष्टी राहणार आहे. या कालावधीत होणारा प्रवास आपणासाठी फलदायी होणार आहे. प्रवासामध्ये तत्त्वज्ञान आणि दूरदृष्टीमध्ये वाढ होणार आहे. व्यावसायिकदृष्ट्या किंवा कौटुंबिक पातळीवर आपल्या जबाबदाऱ्या आपण चांगल्या पार पाडणार आहात. व्यावसायिक भागीदारीमुळे छोट्या-मोठ्या समस्या उभ्या राहतील.
नवीन संधी मिळतील
मिथुन – आपला आत्मविश्वास चांगला राहणार आहे. आपली बुद्धी आणि विचार सकारात्मक राहणार आहे. आपले कौटुंबिक प्रश्न चांगल्या तऱ्हेने सोडवणार आहात. विवाहयोग्य व्यक्तींना एकापेक्षा जास्त प्रस्ताव आपल्या समोर येणार आहेत. नोकरी-व्यवसाय यामध्येसुद्धा आपणास नवनवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. कोणतीही संधी विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. कामधंद्याच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल. हे प्रवास आपल्यासाठी फलदायी ठरतील. नोकरी करत असाल, तर कामाच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीमध्ये सुधारणा होणार आहे.
सावध पावले उचला
कर्क – आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी आपण सर्व तऱ्हेने दक्ष असले पाहिजे. आधीच परिस्थिती फारशी अनुकूल नाही आहे, त्यामुळे सावध पावले उचलली पाहिजेत. पण आपण आपल्या हुशारी व कार्यकुशलतेने सर्व परिस्थिती धैर्याने आणि विवेकाने सांभाळणार आहात. या कालावधीमध्ये आपला खर्चही वाढणार आहे. आपणास गुंतवणूक करायची असल्यास शेअर मार्केट किंवा अशाच संबंधीत गुंतवणूक करू नका. जर गुंतवणूक करायची असेल, तर सोने किंवा स्थिर मालमत्तेत केल्यास फायदा होईल. आपल्या गुणवत्तेने उत्तम यश येणार आहे.
अनुकूल परिस्थितीचा लाभ
सिंह – आपल्याकडे असणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे तुम्ही अनेकांना स्वतःकडे आकृष्ट करणार आहात. आर्थिकदृष्ट्या हा चांगला काळ आहे. आपल्याकडे अतिशय उत्तम संवादकौशल्य असणार आहे. या कालावधीमध्ये चांगला आर्थिक मोबदला मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणीची परिस्थिती नक्की सुधारणार आहे. तुमच्या सहकाऱ्यांकडून सर्व प्रकारे मदत मिळण्याची शक्यता आहे. आपली बचतही होऊ शकते. नवीन संधी येऊ शकतात. नवीन करार व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकतात.
प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य
कन्या – सप्ताहाच्या सुरुवातीला कामामध्ये खूपच धावपळ असणार आहे. व्यापार, व्यवसायासाठी आपल्याला एखाद्या वेळेस शहराबाहेर जावे लागणार आहे. त्याचवेळेस नेमके एखादे घरातले महत्त्वाचे काम किंवा एखाद्याचे आजारपण समोर येणार आहे. त्यामुळे आपली कुचंबणा होण्याची शक्यता आहे. आपण आपले काम सकारात्मक दृष्टिकोन ठेवून केले, तर चांगला फायदा होईल. आपल्या सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. विरोधकांवर मात कराल. प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रासाठी हा कालावधी उत्तम आहे.
आव्हानांवर मात कराल
तूळ – तुमच्यासमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवणार आहात. व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील. कारण तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे असणार आहात. हा कालावधी आपणास उत्पन्न मिळवून देणार आहे. तुमच्या कष्टाचे चीज होण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही. आपल्या नातेवाइकांमुळे काही तणावाचे प्रसंग उद्भवू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.
नशिबाची साथ लाभेल
वृश्चिक – नशिबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे व्यस्त जीवन सकारात्मक राहील. जोडीदाराच्या माध्यमातून आपणास लाभ होणार आहे. प्रवास होतील. नवीन उद्योगाची सुरुवातही होऊ शकते. व्यवसाय विस्तारासाठी अनुकूल परिस्थिती आहे. मात्र कोणतेही व्यावसायिक लहान-मोठे निर्णय पूर्ण विचारांती घेणे इष्ट ठरेल. उधारी उसनवारी टाळावी. नातेवाईक किंवा सगेसोयरे यांच्याशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. भागीदार आणि सहकार्य यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून दक्ष असावे.
प्रयत्नशील राहा
धनु – परिवारातील व्यक्तींचे सामंजस्याचे संबंध असणार आहेत. पती-पत्नीमध्ये मधुर संबंध निर्माण होतील. प्रेमीयुगुलांसाठी हा कालावधी चांगला असणार आहे. प्रेमात सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे आपण खूश असाल; परंतु परिस्थितीचे भान ठेवणे जरुरीचे ठरेल. ज्ञानार्जन आणि प्रगतीच्या भरपूर संधी या कालावधीत उपलब्ध होणार आहेत. आपण कार्यमग्न राहून प्रयत्नशील राहा. आलेल्या संधीचे सोने करणे आपल्या हातात आहे. हे लक्षात ठेवणे जरुरीचे ठरेल. आपले जीवन अधिक स्थिर होणार आहे. व्यावसायिकांनी खासगी आयुष्यात समतोल साधावा.
रागावर नियंत्रण आवश्यक
मकर – संबंध आणि संवाद यातून तुम्हाला नव्या संधी मिळणार आहेत. त्यातून तुम्ही व्यवसायात विस्तार करू शकता. तुमचे धाडस, तुमची बुद्धिमत्ता यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहेत. आध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही वरची पातळी गाठणार आहात. कौटुंबिक आयुष्यात एकोपा राहणार आहे. आरोग्याच्या छोट्याशा कुरबुरी राहणार आहेत. कष्टाचा मोबदला मिळणार आहे. आपल्या प्रयत्नांना यश येणार आहे. तुम्ही जे काम हाती घ्याल, त्यात यशस्वी होण्याचे ग्रहमान आहे. कापणे, भाजणे यापासून सावध राहणे आवश्यक आहे. भागीदार आणि सहकाऱ्यांकडून लाभ होतील.
यशाच्या प्रमाणात वृद्धी
कुंभ – तुमच्या कष्टाचे चीज होण्याचा हा काळ आहे. तुम्ही तुमच्या क्षमतेएवढे काम करत आहात. हे दुसऱ्याला प्रेरणा मिळण्यासारखे आपल्याकडे गुण आहेत. प्रवास करण्याचा हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुमच्याकडे येणाऱ्या सुखाचा उपभोग तुम्ही घेणार आहात. तुम्ही यशाची फळे चाखू शकणार आहात. तुम्ही प्रसिद्ध व्यक्तींच्या सहवासात येणार आहात. आपल्या कल्पकतेची प्रशंसा होणार आहे. आरोग्याच्या कुरबुरीमुळे मनस्ताप होणार आहे. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. यापासून दक्ष राहणे आवश्यक आहे. मानसिक तोल सांभाळणे आवश्यक आहे.
योजना कार्यान्वित होतील
मीन – मालमत्तेच्या व्यवहारातून चांगला फायदा होणार आहे. त्यासाठी हा कालावधी चांगला आहे. आर्थिक वादाचा निकाल आपल्या बाजूने लागणार आहे. बरेच दिवसांपासून पगारवाढीची अपेक्षा आहे, ती आत्ता या वेळेला पूर्ण होऊ शकते. आरामदायी वस्तूवर तुम्ही खर्च करणार आहात. राहत्या घरामध्ये भौतिक सुखसुविधा वाढवाल. त्यासाठी खर्चही कराल. कुटुंबातील सदस्यांसाठी खर्च करून त्यांच्या मागण्या पूर्ण कराल. आपण या कालावधीमध्ये सर्जनशील क्षमतांचा उपयोग करू शकता. आपण चांगल्या तऱ्हेने व्यक्त होऊ शकता. कार्यक्षेत्रातील अनपेक्षित बदल लाभकारी असतील.

Recent Posts

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी घेणार इस्रोच्या उपग्रहांची मदत

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

18 minutes ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

45 minutes ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

53 minutes ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

2 hours ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

2 hours ago

महाराष्ट्राला बालमृत्यूचे ग्रहण!

सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…

3 hours ago