नवी दिल्ली (हिं.स) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षण मंत्री आणि जेष्ठ भाजप नेते राजनाथ सिंह यांना ट्वीटर द्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "माझे आदरणीय मंत्रिमंडळ सहकारी राजनाथ सिंह जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भारताला संरक्षण क्षेत्रात मजबूत आणि स्वावलंबी बनवण्यासाठी ते उत्कृष्ट प्रयत्न करत आहेत. समाजसेवा, शेती आणि ग्रामविकासाची त्यांची तळमळ सर्वश्रुत आहे. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना."
https://twitter.com/narendramodi/status/1545966715644678144
राजनाथ सिंह यांनी शुभेच्छांसाठी मोदींचे आभार मानले
पंतप्रधान जी, शुभेच्छा आणि चांगल्या शब्दांबद्दल धन्यवाद. तुमच्या सक्षम नेतृत्वाखाली राष्ट्र स्वावलंबनाच्या दिशेने उल्लेखनीय प्रगती करत आहे.