Sunday, April 20, 2025
Homeदेशसमानता आणि एकता युक्त वारकरी चळवळ उत्कृष्ट परंपरेचे उदाहरण : पंतप्रधान

समानता आणि एकता युक्त वारकरी चळवळ उत्कृष्ट परंपरेचे उदाहरण : पंतप्रधान

नवी दिल्ली (हिं.स) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचे उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे.

आषाढी एकादशीच्या या पवित्र प्रसंगी सर्वांना शुभेच्छा. भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहोत आणि आपल्या समाजात आनंदाची भावना वृद्धिंगत होऊ दे. वारकरी परंपरा आणि पंढरपुरातील भक्तिमय वातावरण याविषयी यापूर्वीच्या ‘मन की बात’ मध्ये मी सांगितले.

काही आठवड्यांपूर्वी मी संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी देहू येथे गेलो होतो. माझ्या भाषणात महान वारकरी संत आणि महात्म्यांचे उदात्त विचार मी अधोरेखित केले होते आणि आपल्या सर्वांना त्यामधून काय शिकता येईल त्याविषयी बोललो होतो.

पंढरपूरमध्ये धार्मिक पर्यटनाला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमीपूजन करण्याचा बहुमान गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मला प्राप्त झाला होता. भारताच्या युवा वर्गामध्ये वारकरी परंपरा आणखी लोकप्रिय करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.

काही आठवड्यांपूर्वी देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे उद्घाटन करताना केलेल्या भाषणाची चित्रफीत देखील पंतप्रधानांनी यावेळी प्रदर्शित केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -