Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रगणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या ३२५ बसेसचे नियोजन

गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या ३२५ बसेसचे नियोजन

विरार (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी यंदाच्या वर्षीही राज्य परिवहन महामंडळातर्फे विशेष बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जवळपास ३२५ गाड्या सोडण्याचे नियोजन पालघर एसटी महामंडळाकडून करण्यात आहे. यासाठी मागील आठवडाभरापासून प्रवासासाठीचे आरक्षण सुरू केले आहे.

गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात महत्त्वाचा सण समजला जातो. कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असल्याने वसई-विरार मधून दर वर्षी मोठ्या संख्येने चाकरमानी हे गणेशोत्सवासाठी गावी जातात. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. या वर्षी ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यासाठी पालघर एसटी महामंडळानेही विशेष गाड्या सोडण्याच्या संदर्भात नियोजन सुरू केले आहे. यात वसई, अर्नाळा, नालासोपारा या आगारातून ३२५ गाड्या सोडण्यात येणार आहेत. यातील २०० गाड्या या सामूहिक आरक्षणासाठी तर इतर आरक्षणासाठी १२५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवासाठी २५ ऑगस्ट पासून गाड्यांचा प्रवास सुरू करण्यात येणार आहे. आठवडाभरापासून आरक्षण सुरू झाले आहे. सध्या आम्ही ३२५ गाड्यांचे नियोजन करून ठेवले आहे. जशा गाड्या आरक्षित होतील, त्यानुसार पुढील नियोजन केले जाईल, असे पालघर विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी सांगितले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -