गोंदिया (हिं.स.) : गोंदिया जिल्ह्यात आज दुपारपासूनच विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान तिरोडा तालुक्यातील बोदा येथे वीज पडून बैलजोडी ठार झाल्याची घटना तिरोडा तालुक्यातील बोदा येथे घडली.
यात तिरथलाल बालचंद पारधी या शेतकऱ्याची बैलजोडी ठार झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही बैलांची किंमत ५० हजार रुपये होती. ऐन शेतीच्या हंगामात बैलजोडी ठार झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. तेव्हा त्या शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.