Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

राज्यात २५९१ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान, एकूण १८३६९ ॲक्टिव्ह रुग्ण

राज्यात २५९१ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान, एकूण १८३६९ ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई (हिं.स.) : राज्यात आज २५९१ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर एकही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात आज रोजी एकूण १८३६९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज २८९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण ७८,३७,६७९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९२% एवढे झाले आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२३,८२,४४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,०४,०२४ (०९.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा