Wednesday, April 30, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

आदित्य ठाकरेंनी मुंबईला भ्रष्टाचाराची गटारगंगा केली; नितेश राणे यांची टीका

आदित्य ठाकरेंनी मुंबईला भ्रष्टाचाराची गटारगंगा केली; नितेश राणे यांची टीका

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी ठेकेदारांच्या फायद्यासाठी मुंबईला भ्रष्टाचाराची गटारगंगा केली, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत हा आरोप केला आहे.

ट्वीटमध्ये नितेश राणे म्हणाले की, “देशात आर्थिक विकासाची गंगा आणणाऱ्या आपल्या मुंबईला आदित्यसेनेने ठेकेदारांसाठी भ्रष्टाचाराची गटारगंगा केली आहे.” यासोबत नितेश राणे यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेली विधाने कशी फोल ठरली आहेत, याची तुलना केली आहे. मुंबईतील अनेक रस्त्यावर पाणी साचून नागरिकांना त्रास होत असलेले व्हिडीओमध्ये दिसत आहे.

व्हिडीओच्या माध्यमातून देखील त्यांनी आदित्य ठाकरेंवर टोलेबाजी केली आहे. “पहिल्याच पावसाने केली मनपाची पोलखोल, नालेसफाईच्या कामात झालाय झोल, टक्केवारीवीरांनी मुंबईकरांचे ५ हजार कोटी बुडवून दाखवले, कंत्राटदार आले पैशात न्हाऊन, मुंबईकर गेला पावसात वाहून, मुंबईची तुंबई करून दाखवली.” अशा शब्दांत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

Comments
Add Comment